पुस्तक भक्त
पुस्तक भक्त
शब्द शब्दाने जोडून
बनतात वाक्य भावपूर्ण,
भावना उतरते मनातले
वाक्यातून पुस्तकात अर्थपूर्ण..!!१!!
एकांत मनास वाटता
पुस्तकात फिरून यावे,
दूरदूरच्या गावातून
फेरफटका मारण्यास जावे..!!२!!
जाणून घ्यावे चरित्र
व्यक्ती, समूह, संस्थेचे,
शोध, उत्पत्ती, अविष्कार
गोष्टी समजती महत्त्वाचे..!!३!!
साहित्यिक घडे यातून
निर्मिती नव्या विचारांची,
योग्य अयोग्य समजण्यास
साथ मिळे पुस्तकांची..!!४!!
समस्येतून बाहेर काडी
सुविचाराने फुललेली शक्ती,
जो योग्य वाचेल साहित्य
त्यास कळे पुस्तकाची भक्ती..!!५!!
