पतंग
पतंग
दोघंही घनिष्ठ मैत्र
उत्तुंग अशी मैत्री
बाल्यकालः चे हो मैत्र
पण एकाचे टक्कल विचित्र
तर एकाचे केस
अर्धवट रंगवलेल हो चित्र
तेव्हा चड्डी संभाळून
तर आता पायजमा संभाळून
तेव्हा...गावच्या टेकडीवरून
आज शहरी टॉवरच्या टेरेस वरून
उडवू पहाताय एक भली रंगीत पतंग!!
"अरे पळ ....दोर कर की गोळा..."
"अरे पण ...आर्थायटिस आहे मला..."
"व्वा सोडलास का दोरा ....."
"अरे सुटला .....रे"
......हो कधीतरी सूटणारच की....
किती धरणार हातात?
हो...आता वय झाले की.....
कवळ्या लागल्या तोंडात‐----!
"बर.....लाडू कडक..तर....
चुराच आणलाय मी......"
"वडी चिवट ....मीपण चुरा..."
दात असतांना तिळगुळ कमी...
नसतांना ....आता आहे भरपूर....!
आयुष्य आपले कसे हो असे
विचित्र?
असे हे दोघंही घनिष्ठ मैत्र.......
