प्रवास लेखणीचा...
प्रवास लेखणीचा...
प्रवास लेखणीचा थांबता थांबेना
विचारांचा पूर ओसरता ओसरेना
रोजच चक्र नेहमी काल वक्र
विचाराचे ओझे मनात फिक्र
शांततेच वादळ आता सोसवेना
विचारांचा पूर ओसरता ओसरेना
ठरवले जरी मन नाही भानावर
आठवणीचाच वावर सदैव डोळाभर
रडाव की हसाव समजेना
आठवणींचा पूर ओसरता ओसरेना
पुसले जरी क्षण विसरून भुतकाळ
आठवण घेते का कधी माघार ?
दत्त म्हणून परत पुढ्यात उभी ना!!
आठवणींचा पूर ओसरता ओसरेना
प्रवास लेखणीचा थांबता थांबेना
विचारांचा पूर ओसरता ओसरेना...
