आठवण
आठवण
1 min
448
काय असते आठवण?
मनात रुजलेली,
रंगात भिजलेली इंद्रधनुसारखी सात रंग उधळणारी
कधी एकटेपणा वाटला तर,
गोड स्मृती जागवणारी,
आणि कधी डोळे भरून आले तर,
अश्रू म्हणून वाहणारी.
खरच कय असते आठवण ?
वर्तमानात राहून सुद्धा भुतकाळात नेणारी,
कोणी दूर असले तरी जवळ
असल्याचा भास देणारी ,
खरच काय असते आठवण ?
मनातील गोड आणि कटू स्मृतींचा आस्वाद
तर कधी अचानकपणे पडणारा भास
हिच असते आठवण , खरंच
हिच असते आठवण ....
