STORYMIRROR

Hrishikesh Kholamkar

Abstract Fantasy Others

3  

Hrishikesh Kholamkar

Abstract Fantasy Others

प्रवाहाबरोबर विहरणारे

प्रवाहाबरोबर विहरणारे

1 min
181

काय सांगू ते चार दिवस कधीही न विसरणारे

कोकणातील वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर विहरणारे


भीती होती रात्रीच्या अंधारात प्रवासाची

त्याच बरोबर साथ होती आंबोळी च्या नागमोडी वळणाची

 

दिवस सुरु झाला कणकवली च्या सूर्योदयाने

डोळ्यांना हि अंघोळ घातली त्या लाल मातीने


कौलारू घर बघून किस्से आठवले बालपणाचे

आपण मोठे आहोत जाणीव झाली नारळी झाडांच्या उंचीने


दमट हवामानामुळे शरीर होते तापलेले

पण अंगणेवाडी देवी च्या मंदिरातल्या गारव्याने ते थंडावले


काळ आला होता सिंधुदुर्गचे बुलंद बुरुज बघण्याची

वरुण देवाच्या मनी नव्हते कारण वेळ आली हाती भरतीची


काय सांगू मज्जा रॉक गार्डन च्या लाटांची

भीती वाटत होती त्याच्या वेगाची तर काहींना उंचीची


वेगळीच मजा होती पापलेट खाण्याची 

दुसरीकडे शर्यत लागली होती सोलकढी पिण्याची


त्सुनामी island वर होती सूर्यास्ताच्या किरणांची उधळण

प्रत्येकाच्या मनात आहे एक वेगळीच आठवण


रस्त्याच्या दुतर्फा पसरला आहे झाडांचा हिरवा सडा

दत्त मंदिरातील शांततेचा सर्वांनीच घ्यावा धडा


सुंदर होते रेडी गणपती आणि विक्रम - वेताळ ची मंदिरे

त्यांची साक्ष देतात तेथील विशाळ पादत्राणे 


इतके स्वच्छ आणि सुंदर होते तारकर्ली चे समुद्रकिनारे

काय तुमचे लक्ष जाईल तेथील हिरवळी कडे


ड्रीम land गार्डन चे वर्णन करू तेवढे थोडेच आहे

तेथील कमळांत पण एक वेगळीच जादू आहे


हे असे ते चार दिवस कधीही न विसरणारे

कोकणातील वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर विहरणारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract