STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

1 min
372

दिन आज आनंदाचा सर्व भारतीयांचा

प्रजासत्ताक वा गणतंत्र दिन भारताचा

राज्य घटनेची सुरुवात २६ जा.१९५० ला

७३ वा दिन आज करतो आपण संविधानाचा


१४ ऑगस्ट १९४७ ला मध्यरात्री भारत देश

झाला स्वतंत्र ब्रिटिश राज्याच्या पारतंत्र्यातून

स्वातंत्र्याचा पंचाहत्तर वर्षाचा झाला कालावधी 

१९५० पासून लोकशाही झाली संविधानातून


स्वतंत्र भारताचे संविधान केले आंबेडकरांनी

२६ जा.१९३० पूर्णस्वराज शपथ दिन निवडला

प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असलेले राष्ट्र

संविधानाने भारताला लोकशाही देश बनवला


रंगबेरंगी पताका व फुलांनी भारत देश सजला 

लाल किल्ल्यावर तिरंगी झेंडा डौलात फडकला

देशासाठी बलिदान दिले त्या सर्व हुतात्म्यांना

आदरांजली देण्यास भारतीयाने माथा झुकवला


विश्वरत्न डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळे

राज्य घटना संविधान साकारले शिल्पकाराने

 लोकशाही आली अन् नष्ट झाली अस्पृश्यता

सर्वांना आनंदी आनंद दिला दिन प्रजासत्ताकाने.


समानता, बंधुभाव,न्याय देवता , मत अधिकार

राज्य घटनेनुसार प्राप्त झाले सकल भारतीयांना

लोकांचे, लोकांसाठी, लोकांच्या निर्णयाप्रमाणेच

लोकशाहीची सुरुवात केले संविधान प्रस्थापितांना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational