Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jiveshwari Vivek Topale

Abstract Inspirational

3  

Jiveshwari Vivek Topale

Abstract Inspirational

परिस

परिस

1 min
217


सर्वांचा आधार बाबा अन आई..

मंदिरात सजले जणू _विठोबा रखुमाई_...!


सेवा माझ्याकडून घडो तुमच्या पायी...

तुम्हीच तर आहात माझे _विठोबा-रखुमाई_..!


तुमच्यासारखे प्रेमळ जगात कुणी नाही...

_तुका_ माझे बाबा _आवली_ माझी आई..!


पाण्याविना मासा राहूच शकत नाही...

आई बाबा विना जीवन जगले जाऊच शकत नाही..!


तुमच्यामुळे आम्हाला कमतरता कशाचीही नाही...

तुम्हीच आहात _शहाजी_ अन् _जिजाई_..!


लोखंडाचे आम्ही सोन्याची गरज नाही...

तुम्हीच तर _परिस_ आहात बाबा अन आई..!


सदा सर्वदा जन्म होवो तुमच्या ठाई... 

तुम्हीच आहात _नंदलाला_ अन् _यशोदा_ माई..!


तुम्ही आहात सर्व सत्य असत्य काही नाही...

तुम्हा दोघांसाठी तर माझ्याकडे शब्दही उरले नाही..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract