परग्रहावरची काल्पनिक सहल
परग्रहावरची काल्पनिक सहल
पृथ्वीवरची मुले चंद्रावर गेली , चंद्राच्या गमती ऐकू लागली ।। धृ ।।
चंद्रावरच्या शाळेत टेक्नॉलॉजी असते , पुस्तकाचे ओझे पाठीवरती नसते ।। १ ।।
लॅपटॉप आणि टॅब वर्गात असते , शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते ।। २ ।।
मुलांजवळ असते स्मार्ट वॉच असते , आपली भाषा त्यांची भाषा अन मॅच ।। ३ ।।
मुलांजवळ असते संगणक डबी , तिच्यात असते सगळी खूबी ।। ४ ।।
इतक्यात तबकडी चमकू लागली , मुलांना घेऊन भुरकन गेली ।। ५ ।।
