STORYMIRROR

Ajay Chavhan

Romance

3  

Ajay Chavhan

Romance

प्रेमपत्र....

प्रेमपत्र....

1 min
255

प्रिय सखे तुला मी गं

लिहितोय प्रेमपत्र ।

काय करावे काही सुचेना

तूच दिसतेस मला सर्वत्र ।।

कधी जडले तुजवर प्रेम

मला गं ना हे कळले ।

वेडे माझे मन सखे

तुझ्या रूपावर भाळले ।।

ना लागे वाचण्यात मन

ना सखे गं शिकवण्यात ।

आयुष्याचे हे दिस सखे

जातेय अश्रू ढाळण्यात ।।

करतोय तुजवर खरं प्रेम मी

नाही गं तुझ्या धनावर ।

ध्यानी,मनी तूच माझ्या

माझे लक्ष ना अन्य कुणावर ।।

भेट मला एकदाचे

सांग तुझ्या मनात काय ।

बसलोय सखे वाट पाहत

काय असेल तुझा अभिप्राय ।।


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance