प्रेमिका
प्रेमिका
तू माझे स्वप्न आहे,
ती माझी कल्पना !
तू माझी सावली आहे,
ती माझा आभास !
तू माझी राधिका आहे,
ती माझी मीरा !
तू माझी चंद्रिका आहे,
ती माझी तारका !
तू माझा गालिचा आहे,
ती माझी मखमल !
तू माझी साधना आहे,
ती माझे साध्ये !
तू माझा स्वर्ग आहे,
ती स्वर्गातील अप्सरा !
तू माझे प्रेम आहे,
ती माझी प्रेमिका !