STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

3  

Meenakshi Kilawat

Romance

प्रेमाला होईल पारखा"

प्रेमाला होईल पारखा"

1 min
241

नयना मध्ये पाहिला तो

प्रेमभरीत सागर प्रितीचा

पण प्रेमाला होईल पारखा

म्हणुन केला निर्धार मनाचा...


या सुप्त भावनांना आले 

तृप्त भावनेचे मस्त उधान  

मनाच्या वृंदावनात माझ्या

 मुक्तपंखी मोर नाचले...


विश्वासाने जीवनातले

वेदनेचे सारे पांग फेडीले,

सफलतेच्या वाराने इथे

तनाव तिमिर झाकले...


आयुष्यात माझ्या आले 

अनेक क्षण हे मंतरलेले 

प्रत्येक कारणाचे दिले मी

अद्भूत रुपांतरीत दाखले...


अजूनही आठवतो तो क्षण 

अन् मोरपिसाचा अलगद पिसारा

अंगावरूनी भारलेल्या पीसांचा

तनामनात मज होतोय शहारा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance