STORYMIRROR

Ramkrushn Patil

Romance

4  

Ramkrushn Patil

Romance

प्रेमाच्या पाऊसधारा

प्रेमाच्या पाऊसधारा

1 min
172

मेघा रे मेघा रे

पाऊसधारा बरसू दे

तिच्या आणि माझ्यामध्ये

प्रेमाचा अंकुर फुटू दे


बरसत आहेत पाऊसधारा

तिला मन माझं शोधतंय

तिच्या प्रेम पावसासाठी

मी वेडा चातक वाट पाहतोय


श्रावण सरी बरसतांना

तू माझ्या जवळ असावीस

होता विजेंच्या कडकडाट

हळूच माझ्या कुशीत शिरावीस


तुझ्या प्रेमाच्या पाऊसधारा

अशा माझ्यावर बरसु दे

होऊ दे तृप्त एकदाचा मला

मनसोक्त तुझ्या प्रेमात भिजू दे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance