प्रेमाची कहाणी
प्रेमाची कहाणी
माझ्या स्वप्नाची राणी
तुझी कीमयाच न्यारी
स्मित हास्य गोड तुझे
मन सैर बैर होई
तुझी तिरकी नजर
मन होई हे घायाळ
असे रोजचेच तिर
तुझ्या प्रेमाचा होकार
तुझ्या कडे बघणे ते
नजरेला नजर देणे
आजही आठवते मला
पाहून मला तुझे लाजणे
प्रेमात मी तुझ्या राणी
झालो पूर्ण आता धुंद
तू पण बावरून गेली
स्वतःतच झाली गुंग

