प्रेमाचा अर्थ
प्रेमाचा अर्थ
मी करतो प्रेम जसे,
ती ही करत असेल का ?
हातात हात घालून चालताना,
तीही मलाच आठवत असेल का?
लाजताना चेहरा जरा तिचा गोडच दिसतो,
नजर लागू नये म्हणुन चार मित्रात कमीच मिरवतो.
एवढे प्रेम करूनही भांडणात ती उगच विचारते,
" प्रेम करतोस का रे खरंच?",
मीही जरा "हो" म्हणण्याऐवजी,
"नाही" च म्हणतो.
जखमी मनाला जणू मीठ च चोळतो.
दुसऱ्याच क्षणी, पश्चातापाची लहर येते मनी,
मागे वळून बघता दिसतच नाही कुणी.
तिलाही येत असावी का आठवण माझी,
जशी येते मला तिची?
कोण चुकले? याहून जास्त,
काय चुकले? हा प्रश्न आहे मोठा,
उत्तर मात्र शोधायला अहकारच खोटा.
तरीही जावे म्हणतो एकदा जवळ तिच्या,
डोके ठेवून मांडीवर गोष्टी कराव्या मनाच्या.
उमगायला प्रेमाचा अर्थ जरा उशीरच झाला,
हट्टाने हक्क बुडवूनच नेला.
"आयुष्य भर राहील सोबत", घेतली होती शप्पथ
आता बसलोय लग्नात तिच्या पंगत वाढत.

