दिला होता नकार
दिला होता नकार
रोज येते ती जेव्हा,
असते तेव्हा चारचौघात,
आज नको म्हणून,
परवा दिला होता नकार,
आता येतच नाही आहे मनात
स्वागतात तिच्या केले सडा - शिंपण
सहा ते सहा टाकून रांगोळी,
आले घराला घरपण,
येतच नाहीय ही बया तरीपण
काय करावे काही सुचेना,
सडा झाला, रांगोळी झाली,
पंचपकवान का हिला हवे होय?
घड्याळ पळतेय सुसाट तरी,
हिला काही वेळेचे भानच दिसेना
खूप झाली लाडी - गोडी,
यायचे तेव्हा येईल ती,
पुस्तक-वही ठेवताच दप्तरात,
आली होती जवळ,
कुजबुजत म्हणाली -
सांगते ते लिही पटापटा,
चार ओळी टाकून अश्या ताटात,
पळाली एका झोक्यात,
टाकून मला मोठ्या संकटात
