STORYMIRROR

Pallavi Sonagote

Others

3  

Pallavi Sonagote

Others

शोधात माझ्या

शोधात माझ्या

1 min
204

हरवलोय मी शोधात माझ्या, 

चार चौघात नव्हे एकांतात माझ्या.

गमावले हितचिंतक शोधात राज्याच्या, 

सारे जग पायथ्याशी, अन् नाही संगे एकाच्या.

बंगला जरी स्वर्गापरी,

ओढ लागता घराची, वाटे सारेच राख.

मित्रांच्या संगे एक रुपयाही वाटे लाख.


स्तुतीने केले मज घायाळ,

आई - वडील, भाऊ - बहीण, मित्र - मैत्रीण,

आता सारेच नदी पल्याळ.

गंध जरी कस्तुरीचा मनमोही,

मातीच्या गंधाचा काही तोडच नाही.

हाक आली कानावर, "ये की परत आता",

बघता डोळे उघडुन, भासाच होता हा मनाचा.

हरवलोय मी शोधात माझ्या, 

चार चौघात नव्हे एकांतात माझ्या.


साहित्याला गुण द्या
लॉग इन