प्रेम
प्रेम
तुझ्यातच मन माझे रमू लागलंंय
जिथे तिथे तुलाच शोधू ते लागलंय
भेटीसाठी तुझ्या एका झुरू ते लागलंय
मला प्रिये तुझे प्रेम बघ खुणावतंय
काही करमेना तुझा विना झालंय
स्वप्नात भलत्याच गुंगु लागलंय
रात दिस रात सारखं जाग जागतंंय
मला प्रिये तुझे प्रेम बघ खुणावतंंय
गंधात प्रेमाच्या चिंब चिंब भिजलंंय
काळजाला तुझेच गं प्रेम हे भिडलंंय
तुझ्यावर मन माझे अगाध जडलंंय
मला प्रिये तुझे प्रेम बघ खुणावतंंय
डोळयातुन अश्रूू कसले वाहतंंय
आता मला काही कळतंंय ना वळतंंय
मन फक्त तुझ्या मागे मागे पळू लागलंंय
मला प्रिये तुझे प्रेम बघ खुणावतंंय
भेटून तुला माझा प्रितीच्या फुला
बघ मग कसे ते बहरू लागलंंय
आता मला कळतंंय ना काही वळतंंय
मन फक्त तुझ्या मागे मागे पळतंंय
मला प्रिये तुझे प्रेम बघ खुणावतंंय

