प्रेम
प्रेम
Valentine day
" मी " " तू " आणि " प्रेम "
नजर ....
पापण्यांची फडफड
काळजात चालली
होती धड धड
पदर...
बोटांचा होता चाळा
कधी कधी
गुंडाळलेला बोळा
तनमन....
अधीर झालेलं
दर्शनाला तुझ्या
होतं आसुसलेलं....
प्रेम.....
कळलंच नाही
तुझ्या नजरेची मात्र
बंदी मी झाले
स्पर्श....
मी आसुसले
निसुटत्या स्पर्शानेही
अंगावर रोमांच शहारे...

