STORYMIRROR

Vandana Birwatkar

Romance Others

4  

Vandana Birwatkar

Romance Others

प्रेम

प्रेम

1 min
173

प्रेम म्हणजे ...

गोड संवाद

गोड स्पर्श

स्पर्श अल्हाद

प्रेम म्हणजे...

हृदयाची धडधड

हृदयाचे गीत

हृदयाची तडफड

प्रेम म्हणजे...

दोन विचारांचे

दोन स्वप्नांचे

मिलन दोघांचे

प्रेम म्हणजे....

सुखानंद, अत्यानंद

मनाची शांती

आनंदी आनंद

प्रेम म्हणजे......

सुखाची अनुभूती

समाधानाची प्रीती

मिलनाची प्रचिती

प्रेम म्हणजे.....

रोमांच भावनांचा

आवडीचे समर्पण

गोडव्याचे संक्रमण

प्रेम असे

अमूल्य ठेवा

सदा करावा जतन

लोभ असावा


प्रेम म्हणजे.....

माणुसकी, जिव्हाळा

माया, ममता

निःस्वार्थ सोहळा

प्रेम म्हणजे

आदर एकमेकांचा

आचार- विचारांचा

आधारस्तंभ दोन जीवांचा


Rate this content
Log in

More marathi poem from Vandana Birwatkar

Similar marathi poem from Romance