प्रेम..!
प्रेम..!
प्रेम कधी नाही विचारत की,
"कोण आहेस तू" ?
ते फक्त म्हणते की ,
"माझाच आहेस तू " !!
प्रेम कधी नाही विचारत की,
"कुठे आहेस तू" ?
ते फक्त म्हणते की,
"माझ्याच हृदयात राहतोस तू" !!
प्रेम कधी नाही विचारत की,
"काय करतोस तू" ?
ते फक्त म्हणते की…
"माझ्या हृदयाची
स्पंदने चालवतोस तू" !!
प्रेम कधी नाही विचारत की,
"का दूर आहेस तू" ?
ते फक्त म्हणते की,
"माझ्याच जवळ आहेस तू" !!
प्रेम कधी नाही विचारत की,
"माझ्यावर प्रेम करतोस का तू" ?
ते फक्त म्हणते,
"माझं संपूर्ण आयुष्यच आहेस तू !!

