STORYMIRROR

SATISH KAMBLE

Romance

4  

SATISH KAMBLE

Romance

प्रेम

प्रेम

1 min
619

आली अचानक समोर ती

अन् चंद्राची अनुभूती आली,

रांगोळी केसांची मुखावरी

जणू रात दिवसा अवतरली


गालावरचे तीळ तिचे ते

खुलवी तिच्या सौंदर्याला,

खळीही पडते गालावर अन्

घायाळ करी या हृदयाला


मनोहारी ती चाल तिची ती

नाजूक नाजूक तिची पावले,

नजर हटेना तिच्यावरूनी

पाठलाग मन करू लागले


सौंदर्याची खाणं जणू ती

लोभसवाणे रूप तिचे ते,

अप्सराच जणू पृथ्वीतलावरी

इंद्रधनुची अनुभूती देते


क्षणात पाहता तिला मनामध्ये

प्रेमभावना दाटूनी आली,

शांत या माझ्या मनातली

प्रेमाची तार ती छेडूनी गेली


प्रेमामध्ये होते काय ते

आता मजला समजू लागले,

प्रेमाशी हृदयाचे नाते

आता मजला उमजू लागले


प्रेम म्हणजे मधुर भावना

जीवनातील मधुराई,

प्रेमाशिवाय जगण्याची या

कल्पनाच करवत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance