STORYMIRROR

Juilee Supekar

Drama

2  

Juilee Supekar

Drama

प्रेम...... फक्त एक आठवण

प्रेम...... फक्त एक आठवण

1 min
435

मी तुझा दिवा आणि तू माझी वात

अशीच व्हावी आपल्या प्रेमाची सुरुवात

अशी साद ऐकून पोरी देतात पोरांच्या हातात हात  

मुलं म्हणतात काहीही झालं तरी नाही सोडणार तुझी साथ 


 म्हणून आवडीने खातात त्यांच्या हातचा दहीभात 

करतात एकमेकांनवर प्रेमाची बरसात

मग दोघेही प्रेमाची नशा करतात 

आणि आयुष्यभराची स्वप्न रंगवतात 


प्रेमात अडथळे ठरलेलेच असतात 

तीच अडथळे वेगळ व्हायला भाग पाडतात 

सरूनी जाते प्रेमाची पहाट आणि येते विरहाची रात  

थोड्याच क्षणी दोघांचे मार्ग वेगळे होतात  


जरी ते परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर होतात 

तरी कळत नकळत एकमेकांना आधार देतात 

हृदयाच्या छोट्याशा कोपर्यात आठवणी जपून ठेवतात

शेवटी फक्त प्रेमाच्या या वाटेवर आठवणींची फुले बसतात.


Rate this content
Log in

More marathi poem from Juilee Supekar

Similar marathi poem from Drama