STORYMIRROR

Sushama Gholap

Inspirational

3  

Sushama Gholap

Inspirational

प्रेम कुणावर करावे

प्रेम कुणावर करावे

1 min
11.7K

प्रेम करावे स्वतःवर

स्वतःतील स्वप्नांवर

ध्येय धरावे मनावर

पूर्तीनंतर सर्वांवर


प्रेम करावे शाळेवर

ज्ञान दिलेल्या गुरुजींवर

शाळेतील अनुभवांवर

अनुभवलेल्या उपक्रमावर


प्रेम करावे मंदिरावर

मंदिरातील मूर्तीवर

चांगले वागून धरतीवर

यश लाभेल श्रीच्या मर्जीवर


प्रेम करावे समाजावर

समाजातील माणसावर

ओरखडे नकोत मनावर

लक्ष नसावे धनावर


प्रेम करावे निसर्गावर

निसर्गातील पशू-पक्ष्यावर

बिया फेकाव्या डोंगरावर

पाऊस पडेल माळावर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational