आई
आई
1 min
11.5K
आई थोर तुझे उपकार
तुझ्या कुशीत जन्म सार्थ
सुखदुःखाचा केला तू स्विकार
तुझ्यामुळेच जिवनाला अर्थ
आठवणी तुझ्या किती सांगू
अळवाच्या पानासम दाटल्या
परमेश्र्वराकडे ते काय मागू
तुझ्यामुळेच चिंता मिंटल्या
तू दिलेस आम्हा शिक्षण
शिक्षणाबरोबर संस्कार
शिक्षणावरच आमचे सुलक्षण
कसे फेडू तुझे उपकार
तुझ्या भेटीची लागली आस
खाताना अडतो घास
तुझ्या ठेवणीची पैठणी खास
बघत राहते मी तासनतास
झिजवलीस आम्हास्तव काया
तू तर आयुष्यातील तारा
कायम तुझी बरसते छाया
तुझ्याशिवाय नाही थारा
