STORYMIRROR

Leena Mate

Romance

3  

Leena Mate

Romance

प्रेम करावं

प्रेम करावं

1 min
14K


प्रेम करावं राधेसारखं

प्रेम करावं मीरेसारखं

प्रेम करावं शबरीसारखं

प्रेम करावं सीतेसारखं

प्रेम कुणावरही करावं

डोंगर- दऱ्या, लुकलुक तारे

खळाळत पाणी, झिम्माड पाऊस

उगवतीची पूर्वा, मावळतीची पश्चिमा

दाटून आलेला गडद अंधार

प्रेम कुणावरही करावं

आईच्या कुशीतल्या तान्हुल्यावर

स्तनातून पाझरणाऱ्या मायेवर

अन दुडु दुडु धावणाऱ्या पावलांसवे

दमछाकणाऱ्या पिलाच्या आईवर

प्रेम कुणावरही करावं

जिजाऊ माता, हिरा गवळण

आधुनिक युगातल्या किती हिरकण्या

आपली हौस-मौज बाजूला सारत

धावत पळत मस्टर गाठणाऱ्या

प्रेम कुणावरही करावं

शाळा कॉलेजच्या प्रवेशासाठी

रांगेत तिष्ठ्णाऱ्या बाबांवर

मुलांच्या उद्याच्या भविष्यासाठी

आपला 'आज ' विसरणाऱ्यांवर

प्रेम कुणावरही करावं




 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance