प्रेम केले आहे....
प्रेम केले आहे....
माझे मन तुझ्यात
हरवून गेले आहे
सखे साजने मी तुझ्यावर
खरे प्रेम केले आहे...
चंद्राहून प्यारा तुझा
मुखडा पाहून
ओठावर न्यारा तुझ्या
गुलाब पाहून
माझे मी सारे तुझ्या
नावी केले आहे...
माझी मी संध्या
तुझ्यातच पाहिली
तुझी ती अदा माझ्या
डोळ्यातच राहिली
वार तुझ्या नयनांचे
घाव करून गेले आहे...
देवाआधी सखे मी
तुझा जाप केला
माझ तुझ्यावर प्रेम
पाहून देव ही रागावला
तूच माझी पूजा तूच
मन चोरून नेले आहे...
संगम आज तुझ्यात
सार जग विसरला
होत जग जिंकण्याच स्वप्न
तुझ्यापुढे तो हरला
त्याचे मन तुझ्या प्रेमात
रंगून गेले आहे...

