प्रेम जणू...
प्रेम जणू...
प्रेम जणू कृष्णाची मुरली
प्रेम जणू राधा बावरली।।
प्रेम जणू मीरेचे भजन
प्रेम जणू मयुराचे नर्तन।।
प्रेम जणू मोती सुबकसा
प्रेम जणू शिंपला मोहकसा।।
प्रेम जणू सरिता ती अवखळ
प्रेम जणू सिंधू तो निश्चल।।
प्रेम जणू तू मनी वसणारा
प्रेम जणू स्वप्नी दिसणारा।।
प्रेम जणू तू भरून अवकाशी
प्रेम जणू तू सतत मजपाशी।।
प्रेम जणू तुझा सुंदर सहवास
प्रेम जणू तुझे नी माझे अवकाश ।।

