Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manisha divekar

Others

4.8  

manisha divekar

Others

आनंदाचे झाड

आनंदाचे झाड

1 min
670


आनंदाचे झाड गड्यांनो मनात लावून पाहू या ,

अंतरातल्या स्वत:ला चला नवीन काही शिकवू या ॥

उत्तम नाही आले हाती तर मध्यम स्वीकारू या ,

मध्यमाने मग जगण्याचा अध्याय नवा गिरवू या ॥

मोठेखानी प्रासादाची अहमहमिका सोडू या ,

छोटेखानी पण सुखी घरी चला मजेने राहू या ॥

हिरे, माणिक अन् मोत्यांची शोभा सुंदर असते खरी ,

हाैस असू दे मनी परंतु आसक्ती ती सोडू या ॥

भविष्य घडवूच परंतु शर्यत मात्र सोडू या ,

आज, आता या क्षणातील आनंद चला वेचू या ॥

आप्त अन् ज्येष्ठांशी चला प्रेमाने वागू या,

आनंदाचे झाड गड्यांनो मनात लावून पाहू या ॥



Rate this content
Log in