STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

फोडासारखी जपेन

फोडासारखी जपेन

1 min
235

बाळ चिमुकले माझे

उदरात मी जपले

असो मुलगा मुलगी

भेद मुळी न मानले......१


जरी मुलगी म्हणूनी

नको झालीस सर्वांना

तरी गोळा उदरातला

आहे गर्व पालकांना......२


तळहातावर फोड

सांभाळीन मी सदैव

शिकवीन सर्व कला

जन्म तुझा तो सुदैव.....३


वंश पणती घराची

दोन कुटुंबे जोडुनी

धन्य करील आईस

छान घराणे जुळूनी......४


सौख्य जोडशी मायेचे

लक्ष्मी दोन कुटुंबाची

म्हातारपणाची काठी

तू तुझ्या आईबाबांची.....५


जरी झुंज वादळाशी

द्यावी लागली आम्हाला

तरी बिनधास्त देऊ

तुला सदा जपायाला......६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational