"फक्त तिच्यासाठी"...!
"फक्त तिच्यासाठी"...!
माझ्या सखीला वाटते,
फक्त "तिच्यासाठी"च मी काय काय करावे???
आगीच्या झळा सहन कराव्या मी,
फक्त तिच्यासाठी !
रोजच नटावे रोजच सजावे मी,
फक्त तिच्यासाठी !
चंद्राचा साज उतरुनी काढावा मी,
फक्त तिच्यासाठी !
बडबड तिची सहन करावी मी,
फक्त तिच्यासाठी !
चांदण्यांना उगाच छळावे मी,
फक्त तिच्यासाठी !
सुर्यास्ताचा सूर्य धरावा मी,
फक्त तिच्यासाठी !
धाग्यात तिच्या अडकत जावे मी,
फक्त तिच्यासाठी !
नभाला ही आव्हान करावे मी,
फक्त तिच्यासाठी !
एकांतात रुप तिचे गोंजारावे मी,
फक्त तिच्यासाठी !
अंधारात तिचा हात घट्ट धरावा मी,
फक्त तिच्यासाठी !
सजल्यावरी चोरुन पाहावे तिला मी,
फक्त तिच्यासाठी !
दुःख तिचे वाटून घ्यावे मी,
फक्त तिच्यासाठी !
दिलाची माझ्या खेळणी करावी मी,
फक्त तिच्यासाठी !

