असच काहीतरी वाटत असतं...
असच काहीतरी वाटत असतं...
असच काहीतरी वाटत असतं
तिला पाहिल्यावर
ग्रीष्माला ही बहर यावा
तिला पहिल्यावर...
असच काहीतरी वाटत असतं
तिला पाहिल्यावर
अमावस्येला ही चंद्र यावा
तिला पाहिल्यावर...
असच काहीतरी वाटत असतं
तिला पाहिल्यावर
जागी असता ही स्वप्न पडावे
तिला पहिल्यावर...
असच काहीतरी वाटत असतं
तिला पाहिल्यावर
गुलबक्षीला ही सुगंध यावा
तिला पाहिल्यावर...
असच काहीतरी वाटत असतं
तिला पाहिल्यावर
मुक्यांना ही कंठ फुटावा
तिला पाहिल्यावर
असच काहीतरी वाटत असतं
तिला पाहिल्यावर
पाषाणाने ही विरघळत जावं
तिला पाहिल्यावर
असच काहीतरी वाटत असतं
तिला पाहिल्यावर
बाभळीला ही मोहर यावा
तिला पाहिल्यावर...
