STORYMIRROR

Prashant Ruikar

Romance

3  

Prashant Ruikar

Romance

तिला शोधतो मी...

तिला शोधतो मी...

1 min
424

भरल्या ढगाखाली तिला शोधतो मी

पावसाच्या थेंबातही तिला शोधतो मी

पांढऱ्या चाफ्यात तिला शोधतो म

वेलीवरच्या पानातही तिला शोधतो मी


कोकिळेच्या सुरात तिला शोधतो मी

सुरांच्या मैफलीतही तिला शोधतो मी

रसिकांच्या टाळ्यात तिला शोधतो मी

पाखरांच्या थव्यातही तिला शोधतो मी


अत्तराच्या कुपीत तिला शोधतो मी

मोराच्या पिसाऱ्यातही तिला शोधतो मी

कोऱ्या कागदात तिला शोधतो मी

शुभ्र चांदण्यातही तिला शोधतो मी


बहरलेल्या वसंतात तीला शोधतो मी

हृदयाच्या कप्प्यातही तिला शोधतो मी

बंद डोळ्यातही फक्त तिला शोधतो मी


तीला शोधतो मी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance