STORYMIRROR

Durga Deshmukh

Romance

3  

Durga Deshmukh

Romance

पहिल्या प्रेमाचा प्रवास

पहिल्या प्रेमाचा प्रवास

1 min
201

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ऐकण्यात आला एक विचार 

पहाण्याचा ठरला वार 

झोप उडाली रात्रीची

धस्कीने केली सीमा पार


मनाची वाढली चलबिचलता 

कसा असेल जोडीदार 

मला करेल का पंसद 

लग्नाला देईल का होकार 


आईवडिलांची लाडाची लेक

होईल उद्या परक्याचं धन

करुन माझं कन्यादान 

कसं लागेल त्याचं मन


बापाच्या काळजाचा तुकडा

लेक देऊन संसार जोडीतो

वेल मांडवाला जावा म्हणून 

तोंड दाबून हुंदका सोडितो


असकस प्रेम बापाच

कुठ कस ठेवल लपून 

कधी दाखविला नाही आसू

किती साठविल जपून


हे प्रेम कर्तव्याचे की पहिले

कोड्याचे उत्तर नाही कळले

संस्काराचे बिज जोपासताना 

आज हसण्यात आसू वळले


हेच माझे पहिले प्रेम

जे बापाच्या डोळ्यात दिसले

लेकीला सासरी पाठवताना

पाणी होऊन डोळ्यात हसले

🍁🍁🍁🍁🍁🍁


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance