पावसातलं प्रेम
पावसातलं प्रेम
तू सोबत असणं, त्यात पावासाचं येणं
एकाच छत्रीत जाताना, अर्ध अर्ध भिजणं
आता छत्रीही तीच आणि पाऊसही तोच असतो
पण तू सोबत नसते म्हणून, माझा त्याच्यावरती रोष असतो
पण त्याला माझी तमा नसते, आणि नसते माझी कीवही
कारण धरणीला भेटण्याची त्याने, साधली असते वेळ ती
मग त्यांच मिलन पाहून मला पुन्हा तुझी आठवण येते
तुला भेटण्याची हुरहुर मनी पुन्हा दाटून येते
पण तुला आता भेटणं मला कधीच शक्य नसतं
गुपचूप येवून तुला मिठी मारणं आता कधीच शक्य नसतं
मग मी त्या बरसत्या पावसात छत्री बंद करून घेतो
डोळे आणि ओठ घट्ट मिटून, पावसात चिंब भिजून घेतो
अशाच नाजूक विरहक्षणी मग, तव प्रीतीचा जोर वाढतो
धैर्याचे मग बांध फोडूनी, अश्रू होऊनी झरू लागतो
सरसरत्या त्या सरींमध्ये मग, अश्रुधारा समरस होता
सगळ्यांसमोर रडूनही माझे, अश्रू फक्त मला समजता
