पावसाळा
पावसाळा
पूर्वीसमान नाही का आज पावसाळा
चुकते कुठे कुणाचे नाराज पावसाळा
हे गुज अंतरीचे कळते न का नभाला
आसुसलल्या धरेचा आवाज पावसाळा
मिलन युगायुगाचे शृँगारते धराही
घेऊन येत असतो का साज पावसाळा
गंधाळणे मनाचे तू फूल अत्तराचे
सर्वांग हिरवळीचे अन् ताज पावसाळा
भाकीत फोल ठरता चर्चेत वेधशाळा
का गुंतल्या मनाचा अंदाज पावसाळा
