पाऊस
पाऊस
1 min
14.3K
मोहरवितो मनामनांना नव चैतन्याचे लेवूनी वारे
सृष्टीला सौंदर्य बहाल करतो पाऊस
कधी अवखळ सरसर, कधी अल्लड सर
अक्राळविक्राळ रूप, बेहाल करतो पाऊस
अवनीस देऊन हिरवे दान उत्साहाचे बळ पेरून
पेरण्यास नव स्वप्न हिरवी शाल प्रदान करतो पाऊस
शेतकऱ्यांचा बनून मित्र पडतो तो असा सर्वत्र
पिकांचे वरदानरूपाने वाटचाल बनतो पाऊस
चेतवून दीप मनात सर्जनशीलतेच्या प्रतिकात
नवतेजाचे कसे संचरण क्रांतीची मशाल बनतो पाऊस
