STORYMIRROR

Anushka Jagtap

Children

4  

Anushka Jagtap

Children

पाऊस

पाऊस

1 min
469

  पाऊस आला! पाऊस आला!

ऐन दुपारी विजा चमकल्या

कडाडकडकडभणाण वारा

जिकडे तिकडे गारा, गारा.


पाऊस आला! पाऊस आला!

दिवाळीतला खचला किल्ला

भुकत सुटली सगळी कुत्री

आजोबांनी शिवली छत्री!


पाऊस आला! पाऊस आला!

उशीर, त्यातच हा घोटाळा .

बाबा गेले करीत चडफड

आईचेही भिजले पापड.


पाऊस आला! पाऊस आला

आम्ही केला एकच गिल्ला

हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी

चला पळा, शाळेला सुट्टी! 

 


Rate this content
Log in

More marathi poem from Anushka Jagtap

Similar marathi poem from Children