पाऊस
पाऊस
टिप-टिप ने सुरवात होते,
सरसर सऱ्या येतात...
आकाशात इंद्रधनुष्य दिसण्याची,
आपण वाट बघतो...
जेव्हा ढग दाटून येतात,
चिंब चिंब माती होते...
सृष्टी सारी हिरवी होते,
नद्या बहरून वाहू लागतात...
पावसामध्ये भिजूनी,
मुले रमून जातात...
पावसाच्या पाण्यात,
कागदाच्या होड्या खेळू लागतात...
