STORYMIRROR

Gangadhar joshi

Romance

4  

Gangadhar joshi

Romance

पाऊस

पाऊस

1 min
407

दिवस पावसाचे तुला भेटण्याचे

उठे काहूर मनी तुझ्या प्रीतीचे


उन्ह पावसाचा झुला 

बसण्या मी तुला दिला

झुळूक येता वाऱ्याची

खाली वर येई हिंदोळा


आसुसले शब्द सदा 

गाई तुझे च ते गाणे

तुझ्या पैंजणा ची रुण झुण

होईल ते तराणे


दिवस श्रावणाचे थेंबा थेंबाचे

भिजून चिंब ओले होणे

हिरव्या पानांचे


काय देऊ सांग 

कसे मी फेडू पांग

लाजली सांगोपांग

बोबड्या बोलाने


दिवस श्रावणाचे

हळदी उन्हाचे 

सप्तरंगी इंद्रधनू

प्रीतीच्या साक्षीचे


दिवस पावसाचे 

सृजन श्रुष्टीचे 

हिरवी गर्भकांती 

सौभाग्य धरतीचे


दिवस पावसाचे 

तुला भेटण्याचे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance