पाऊस
पाऊस


ऋतू तीन भारतात
त्यात पावसाळा छान
शोभिवंत निर्सगाच्या
किमयेचा अभिमान.
पावसाची सुरुवात
होते मृग नक्षत्राने
बळीराजा शिवारात
करी पेरणी यंत्राने.
रिमझीम पावसाने
हिरवळ सृष्टीवरी
शालू हिरवा नेसली
धरा, पदर डोंगरी.
शुभ्र पाणी झरे वाहे
उंच ते कड्यावरुनी
भासे दूध धबधबे
उड्या मारी आनंदुनी.
श्रावण मासी सौदर्य
पहा धराचे डोळ्यांनी
चमत्कार निसर्गाचा
केला तो मेघराजांनी.