पाऊस
पाऊस
मला आवडत नाही
पण तिला पाऊस आवडतो..
तीला आवडणारा हा पाऊस
मला उगाच चिडवतो..!!
मी खिडकीतून पाहतो त्याला
बेधुंद वर्षाव करताना..
तिला मनमुराद भिजवताना
अन् मला उगाच खिजवताना..!!
पहिल्या पावसाचा थेंब अन् थेंब झेलत
ती वाऱ्याशी खेळत राहते..
अन् मृदुगंधाच्या ओढीने
माझं मन वेडं घुटमळत राहते..!!
आता तृप्त होईल ती
नवतीचा नवा बहर लेवून घेईल..
सुवर्ण स्वप्नांचे सोनेरी कवडसे
माझ्या मनास देऊन जाईल..!!
मला आवडत नाही तरीही
हा पाऊस नजरेस मुग्ध करतो..
तीला मुक्त बहरताना पाहुन
मी नकळत तिच्यावर लुब्ध होतो..!!

