STORYMIRROR

Prabhakar Pawar

Abstract Action Others

3  

Prabhakar Pawar

Abstract Action Others

पाटा वरवंटा

पाटा वरवंटा

1 min
284

आज एक पाटा नि वरवंटा

आपसात गप्पात रंगले होते

आता कामात नव्हते थकले

वर्षानुवर्ष एकांतात खंगले होते


दोघे आठवत होते बालपण

अनेक टाकीचे घाव सोसलेले

म्हणून जन्म सुंदर लाभला होता

आता अश्रू स्व दुर्दैवाला गाळलेले


लाल कुंकवाचा मळवट भरून 

कमरेला बाळ घेऊन कोण एक बाई

उन्हातान्हांत हाळी देत विकून गेली

कुटूंबाच्या मुजोर पोटाच्या भुकेपाई


आता ती काय करते कुठे असेल

त्याचा थांगपत्ताच आता लागत नाही

तिच्या कडेवरची पोर शिकली असेल का ?

एक निश्चित आता ती पाटे विकत नाही


एकवेळ काय आपला राज होता

मुलायम प्रेमळ हाताचा स्पर्श

घामेजली माय चटणी वाटायची

'आवडते लेकाला' मनी दाटायची


तिच्या हाताची अंघोळ नव्हती

तो एक शाहिस्नान होत होता

किती गुळगुळीत काळा रंग होता

जणू पंढरीच्या विठोबाचा संग होता


स्वत:चे सांत्वन करीत ते आपसात म्हणाले

येतील आपले दिवस चांगले, ते दूर नाही

माणूस आता चुलीचे जेवू लागला आहे

स्मितहास्यात दोघांना आशेचा अंकूर पाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract