गंडस्थळ
गंडस्थळ
1 min
303
झुकले की झुकवतात
वाकला की ठोकतात
गंडस्थळ ज्ञात होता
बलशाली हत्ती झोपवतात
वाघ कापून खाल्ला
ऐकण्यात नाही कुठे
रोज लाखो बकर्यांची
हाडे चोखतात येथे
काढून टाकले मी गंडस्थळ
संघर्ष पाचवीला पुजलाय
मृत्यू कुणाच्या बापाचा नाही
तोच जिंकतो जो लडलाय
