STORYMIRROR

Nilesh Bamne

Romance Others

3  

Nilesh Bamne

Romance Others

पाश

पाश

1 min
352

पाशात तुझ्या प्रेमाच्या

मी कधी गुंतत गेलो

मला कळलेच नाही

जेंव्हा कळले तेंव्हा

मी माझा उरलोच नाही 

कसा होतो मी

आता काय झालो 

प्रेमात तुझ्या ?

आसवे माझ्या डोळ्यात

कधीच कोणी पहिली नव्हती

ती ही दिसली जगाला

तुझ्या प्रेमामुळे...

होतो पाषाण मी

आता झालो रुईपरी कोमल

जग हसते माझ्यावर 

मला म्हणोनि प्रेमवेडा

दुःख याचे आहे की

तुला त्याचे

काहीच पडलेले नाही

म्हणून म्हणालो स्वतःशी

तोडावे पाश सारेच प्रेमाचे

पुन्हा जगावे स्वतःसाठी

स्वतःवरच फक्त प्रेम करावे

स्वतःच्या पाशातच गुंतावे

आणि गुंतवावे पाशात

आपल्या प्रेमाच्या इतरांना

पूर्वी सारखे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance