पांग
पांग
लेक पोटी पिकला
तिले लयी मोठेेेपण
दारी जीन गरिबीचंं
वाटे कुुबेेराची सून!!!
ईवलुशा तानुल्याचे
दिसेे पायण्ययात पाय
शेण गोवऱ्या थापुन
सपन पायते व माय!!
लेक ठूणं ठूणं चालेे
तिले कवतीक लई
शिणभाग किती आला
सारा विसरून जाई!!
सुर्य कितीक तापला
तिले वाटे नायी काही
लेक मानगीनं तिच्या
जीवाची होये लाही!!!
तिचा पदर ईवलुसाा
तिची लई मोठी आशा
जनगानीच्या तिच्या रे
नको वाजवू रे ताशा!!!
देह कातड्याचे तुनंं
जरी शिवलेत जोडे
पायी घालून मायच्या
पांग फिटनार थोडे!!!
