पाहुणा
पाहुणा
तो दारात उभा होता...
आमच्या आईशी चर्चा करत...
माझ्या कानावर संभाषण पडलं...
काय आई?
कोणाशी पण बोलत बसतेस ?
माझा सवाल
अरे कोणी पण कसा ?
आईचा प्रतिप्रश्न
म्हणजे ?
माझी विचारणा
अरे, आपली संस्कृती आहे कुणी आला
तरी कमीत कमी पाणी पाजण्याची
आईचं उत्तर
... आणि मी निरुत्तर
