ओंजळीतलं काव्य
ओंजळीतलं काव्य
आभास निवळले आता
दु:खास कळवले आता
हे विस्कटलेली स्वप्ने
केव्हाच विखुरले आता
लागला लळा विरहाचा
आसवे वितळले आता
नागाच भय हो कसल
मी विष हे गीळले आता
ती गेल्यावर आता हे
का मन हळहळले आता
वैर ते भले ही राखो
मी प्रेम उधळले आता
प्रेमातच जखम मिळाली
सगळेच विखुरले आता
