निसर्ग
निसर्ग
फुलांच्या पाकळ्यांना पुन्हा त्या दवाची ओढ असते | .
साज वेळ झाली आता त्या लाजळूच्या पानांना पुन्हा
मिटण्याची खोड असते |
किलबिल सुरु होते अन पुन्हा पाखरांना घरटं
खुणावत असते |
हिरव्यागार रानाला नेहमीचं त्या रानवरायाची
चाहूल असते |
मंद मंद आवाज करत रानवारा येतो त्या भ्रमराच्या
स्वप्न याना नेहमीचं ऊंची देतो |
किर्रर्र त्या रातीला नेहमीचं काजव्यांच्या
प्रकाशाची सोबत असते |
चंद्र येतो आभाळी अन पुन्हा चांदण्याची
त्या भोवती रांगोळी सजते |
झाडाच्या फांदीवर पक्षांचा संसार फुलतो पिलांना
मग पंखात मायेची ऊब मिळते |
कातरवेळी ऋतूने कसा बदल होतो मग काजवा
उजेडाचा खेळ सुरु करतो |