STORYMIRROR

meera uttarwar

Tragedy

4  

meera uttarwar

Tragedy

निर्वंश

निर्वंश

1 min
262

घास नाही सुखाचा; फास वाटतो जवळचा

दगा नेहमीच पावसाचा; जाच पाठी सावकाराचा

 बायको देते हवाला कुंकवाचा

 बाप म्हणे तूच आधार आमचा

मायेच्या डोळ्याच्या झाल्या खाचा

म्हणे इचार कर लेकराचा 

तुकडा ईतभर जमिनीचा

तिथं डोळा सावकाराचा

कशाला विचार लेकराचा

भरोसा भरवसा नाही जिथे उद्याचा

भेगाळली काळी माय ढग आसवांचे डोळा

नको वाटतो आता पोटचाही गोळा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy