नाव साऊच
नाव साऊच
महात्मा ज्योतिबा फुलेंचे
कर्तृत्व आले उदयाला
नाव साऊच शोभल
पुणे विद्यापीठाला.
वसा घेतला ज्योतिषांनी
स्त्रियांच्या शिक्षणाचा
स्पृश्य अस्पृश्य भेद मोडूनी
हौद खुला केला पाण्याचा
पहिली शाळा काढूनी
अजरामर केलं भिडे वाड्याला.
हाती घेऊन लेखणी
केलं अज्ञान हद्दपार
त्या जाचक रूढीतूनी
दलितांचा झाला उध्दार
मानवतेच्या कल्याणासाठी
सत्यशोधक समाज स्थापिला.
होऊनी सावित्री शिक्षिका
आदर्श पत्नी, मुख्याध्यापिका
निभावूनी पतीची साथ
तेवत राहिली क्रांती ज्योत
बालिका दिन गौरव साऊचा
जयंती साजरी तीन जानेवारीला.
